अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर
1 min
155
ना सत्तेची लोभी
ना प्रसिद्धीची आशा
जनतेची माता
बुद्धीची बाळाची मुरत
उरी भरुनी प्रजा प्रेम
हाती घेऊनी मराठी
सत्तेची मशाल
ज्यांनी रचिला नवा हिंदुस्थान
वीर मर्दानी
धनगराची शान
हाती घेऊनी शिवभक्ती
अहिल्या मातेने
रचला नवा इतिहास
महिला ताकद
दाखवली त्यांनी
चेहऱ्यावर तेज
मनात ममता
हातात शिवलिंग
पूर्णत्वाची मूरत
शत्रूला सळो की
पळो करून सोडणारी
वीर नारी
त्यांच्या चरणी
नतमस्तक झाले मी
