अधांतर
अधांतर
1 min
211
अधांतरी हे जीवन मानवा
नकोस जास्त उड्या मारू
उद्याचा भरशसा नाही जीवनी
आजचा दिन आजच छान सारू....
निसर्ग सजवतो,फुलवतो जीवन
निसर्ग आहे आपला सदैव मित्र
निसर्ग सपत्ती वापर जपून करा
मिळते त्या पासूनच मानवा छत्र....
पैसा कमवतोस कुटुंब सांभाळतोस
तरीही अधांतरी आहे मानवाचा पूत्र
जर संपत्ती नसेल आपल्याकडे तर
विचारत नाही आपल्याला कोणी कुत्र...
मानव जन्म मिळाला वाग त्यासमान
जाण सर्वांचीच तू सुख अन दुःखे सदा
मदतीचा हात पुढे कर जमेल तसा
कोणाच्या चूकीवर हासू नको खदाखदा...
