STORYMIRROR

Prajakta Waghmare

Others

3  

Prajakta Waghmare

Others

अडीज अक्षरांच प्रेम

अडीज अक्षरांच प्रेम

1 min
163

अडीच अक्षरांचे असणारे प्रेम हे

जगण्याला नवी कलाटणी देते

सर्वाना आयुष्यात हे एकदातरी होते

प्रत्येकाच्या आयुष्याला बहरवते


अडीच अक्षरांचे असणारे प्रेम हे

डोळ्यात सुंदर स्वप्न सजवते

ह्रदयाची सारी स्पंदने धडधडवते

गोड हसू गालावर उमटवते


अडीच अक्षरांचे असणारे प्रेम हे

एकांतात आठवणींमध्ये रमवते

गोड आठवणींमध्ये मनाला खुलवते

ओठांवर मधुर गीते आणते


अडीच अक्षरांचे असणारे प्रेम हे

कोणाचे पूर्ण होते तर

कोणाचे अधुरे राहते तरी

प्रत्येकाच्या ह्रदयात कायम वसते...



Rate this content
Log in