अबोल प्रीत
अबोल प्रीत
1 min
346
नजरेची भाषा तुला
कधी समजलीच नाही
मनातली प्रेमकळी
कधी उमललीच नाही
दुरूनच पाहत राहिलो
व्यक्त कधी झालोच नाही
तुला कसे कळेल सारे
समोर कधी आलोच नाही
मनातले सारे, तुला सांगायचे
निघायचो रोज ठरवून मनी
पण वेळ निसटली वाळूपरी
कधी मला ते कळलेच नाही
सगळं काही हरलो तरी
हरल्यासारखे वाटत नाही
कुबेर आठवणींचा झालो कधी
माझे मला समजलेच नाही
