STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अभंग

अभंग

1 min
245

संत ज्ञानेश्वर । आपली माऊली ।।

भावांची सावली । सदोदीत।।


मुक्ताई भगिनी । निवृत्ती हो दादा ।।

सोपानची अदा । ज्ञानीसारे ।।


ज्ञानेश्वर जन्म । आपेगावी झाला ।।

आळंदीत आला । ज्ञानासाठी ।।


बाबांनी घेतला । संन्यास संसारी।।

दुःख आले दारी । जीवनात ।।


मुले वनवासी । आळंदीत झाली ।।

परी नाही भ्याली । लीलयेस ।।


मुक्या प्राण्यामुखी । वेद वदवले ।।

ज्ञानार्जन केले । सकलासी ।।


Rate this content
Log in