अभंग एक काव्य
अभंग एक काव्य
1 min
350
कसा गावू मी अभंग
तुझ्या नामात मी दंग
गौतमी शिळा उद्धरली
तुझ्या पायाची सावली
जनीची दळण दळली
तुझ्या पायाचा मी संग
तु असशील जरी काळा
तुझ्या नामाचा जिव्हाळा
घडो वारी वेळोवेळा
प्रल्हादा साठी भंगला स्तंभ
शेती शिवार हिरवी गार
तुझ्या भक्तीचा व्यवहार
तुझ्या प्रेमाची ही धार
तुझा पिकाला ही रंग
