अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
स्मरण करू या १०५ हुतात्मांचे
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे
व्यर्थ न जावो बलिदान त्यांचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
पराक्रम असे थोर शिवरायांचे
साकार केले स्वप्न हिंदवी स्वराज्याचे
राज्य चालवले जनकल्याणाचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
राज्य असे पुरोगामी विचारांचे
शाहू, फुले आणि आंबेडकरांचे
झुगारले बंध वर्णव्यवस्थेचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
इथे वारे वाहिले देशभक्तीचे
जहाल विचार टिळक, सावरकरांचे
गोखले, कान्हेरे लढले युद्ध स्वातंत्र्याचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
इथे नाद घुमतात भक्तीचे
अभंग ते नामदेव, तुकारामांचे
अमृताहुनी गोड अश्या ज्ञानेश्वरीचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
नेहमीच अग्रेसर राज्य आमुचे
औद्योगिकीकरणाचे वारे वाहिले
धडे गिरवले स्त्रीशिक्षणाचे
अभिमानाने सांगतो आम्ही महाराष्ट्राचे
