अभेद्य
अभेद्य
नसले रक्ताचे तरी सहज जुळते,
सहवास वाढला की मैत्री होते.
कधी पुस्तक कधी प्राणी..
कधी बहिण कधी आई..
कधी बाप्पा तर कधी बाप..
उजळणी या नात्याची मला कधी कळलीच नाही....!
संकटात सापडली म्हणून नाव तिच मैत्री,
रोज भेटावं असं आमच्यात तरी नाही.
कधी रस्ता कधी खतरा..
कधी प्रेमळ कधी रागीट..
कधी स्वप्न कधी वास्तव..
अशा मैत्रीचं पान नसतचं कधी कोरं....!
आकाशीच्या कागदाला मैत्रीचा गंध,
मैत्रीच्या नात्याला मग प्रेमाचा रंग.
कधी शाळा कधी काॅलेज..
कधी कट्टा कधी धट्टा..
कधी चहा कधी मैफिल..
अशा अभेद्य मैत्रीच्या रंगछटाच अनेक...!