आयुष्यावर काहीतरी
आयुष्यावर काहीतरी
आयुष्यावर लिहितात सारे, काय असतं आयुष्य
सूरवात होते आयुष्याची, आपले सगळेच असतात
परकेपणं तितकेच असतात, सांगा मला तुम्ही
कोणी कोणाला कितीही दुखावला, माफ सगळ्यांना करायचं असतं.
आयुष्याचे विश्लेषण केले तरी
आयुष्य ही आपली रंगलेली एक बैठक असते
ह्याच बैठकीत जमलेली मंडळी असते रमणीय
दिवस संपला तरी ही बैठक रंगत जाय
आयुष्यावर कोणाजवळ बोलण्याचे शब्दाचं नाही
जमलेल्या बैठकीत मन हे एकांत राही
जमलेल्या बैठकीत कोणी कोणाचं नाही
तेव्हा कळतं इथे आपले तर कोणीच नाही
आयुष्यावर बोलण्यासाठी कोणाजवळ शब्दाचं नाही
मज वाटे की आयुष्य हे स्वप्नमयी आहे
सगळे तिथे आपलेच असतात
तिथे माया, ममता, प्रेम मिळतं
तरीपण स्वप्न हे पूर्ण होते का?
नाही, शेवटी उरतो तो एकाकीपणा
