STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

1 min
399

आयुष्याचा प्रवास,

थोडा सुखद , थोडा दुःखद ,

थोडा कडू , थोडा गोड ,

आणि आयुष्याचा पेपर,

थोडा सोपा , थोडा अवघड.


प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा,

प्रत्येकाचा जगायचा ताल निराळा.

कधी काट्याकुट्यांच्या खडतर वाटा,

कधी उसळणाऱ्या आनंदाच्या लाटा.


कधी गवसती यशाची शिखरे अफाट,

कधी सतावती उद्याची चिंता...

        जगावे लागते मुकाट.


आयुष्याचा प्रवास जणू ,

घाट वळणावळणाचा.

त्याशिवाय कसा येईल,

अनुभव तरी जीवनाचा


Rate this content
Log in