आयुष्यात खूप काही..
आयुष्यात खूप काही..
आयुष्यात खूप काही करायचं असतं पण...
राहूनचं जातं ..
बघता-बघता बालपण निघून जाते
बालपण किती सुख विलासात गेले
हवेची झुळूक असे झाडांवरची फुले
खेळता-खेळता क्षणात दिवस गेले
मस्ती मौज करता तरुणपण आले
तरुणपण येतात जबाबदारीचं
ओझं अंगावर पडतं
हरवलेलं बालपण पुन्हा
शोधायचं राहून जातं....
दिवस-रात्र धाव धाव धावले
तरी योग्य दिशेला मात्र शोधायच
कळायचं राहून जातं
होऊन अपेक्षा शुन्य
चिंतामुक्त व्हावसं वाटलं तरी
शांत-निवांत स्थब्ध व्हायचं राहूनच जातं
ढोल-ताशांच्या गजरात कधी
वाऱ्या सारखं भिरभिरून नाचायचं
असलं तरी राहूनच जातं..
ऐकताच जोक्स कधी लहान
होऊन खळखळून हसून दुःख थोडं
विसरावं म्हटल तर राहूनच जातं
कधी मन भरून येतं,जळत पण
विझवायचं राहून जात..
हृदयाचं पाऊल हृदयाकडे
वळायचंच राहून जातं
पडताच पाऊस पावसामध्ये
अलगद भिजायचं राहून जातं
फुलांच्या सुगंधापरी कधी दरवळायचं,
जन्म आणि मृत्यू यातील अंतर विसरून
थोडं प्रेम स्वतःवर करायचं राहून जातं
आयुष्य मनासारखं जगायचं
आणि जीवनातील प्रत्येक
क्षणाचा आनंद कधी घ्यायचा
राहूनच जात...
आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन वाटतं
"काय कमावलं काय गमावलं" ठरवलं
सर्वांसारख जगायचं नाही सर्वांपेक्षा थोडं वेगळं जगायचं
स्वतःमधल्या स्वतःला जिंकायचं तर राहूनच जातं...
मनाच्या व्यर्थ ताणामुळे जीवनात
बेधुंद व्हावसं वाटलं तरी राहूनच जातं
कधीतरी ओठांवर हसु उमलायच
राहूनच जातं...
म्हणतात ना,
सब कुछ हासील नही होता जिंदगी मे
यहा किसी का "काश" तो किसीका
"अगर" छूट ही जाता है ..
कुछ न कुछ छूटना तो लाजमी है जिंदगी...
बनते बिघडते हालातो का
हिसाब है जिंदगी
हर एक रोज एक नया पन्ना
जोडता है जिसमे,
वह ही एक किताब है जिंदगी...
✨ जिंदगी एक हसीन पल है, जिसमे
ना आज है ना कल है
जिलो इसे अपने मुताबिक
ठान लिया तो जिंदगी का हर
एक हसीन, खुबसूरत पल है
कुछ न कुछ छूटना तो लाजमी है...😊
