STORYMIRROR

Rajan Jadhav

Others

3  

Rajan Jadhav

Others

आयुष्याच्या उतरंडीवर

आयुष्याच्या उतरंडीवर

1 min
145

आयुष्याच्या उतरंडीवर

यशापयश शोधताना

का विसरलीस सखे

सगे-सोयरे असताना


आजवर मिळाले काय तुला

गाडा संसाराचा हाकताना

सारखे विचारु नको मना

चाक गतीचे तूच असताना   


आहेत सुख आणि दुःख

एकाच नाण्याच्या दोन बाजू

मौल्य आपले समजविण्या

झुलवितात प्रारब्धाचा तराजू


समकालीन माझे किती मस्त

का मग मीच अशी भकास

त्यागून वैफल्य विचारांचे

जगून घे आतातरी झकास


नव्हते काहीच पूर्वनियोजित

झाला समजण्यास उशीर

दुभंगली कित्येक स्वप्ने तुझी

ध्येय राहीले मात्र पैलतीर


 आर्तसाद ती ऐकून परमेश्वर

 अवघी चिंता सोबत नेईल

 फुलविण्या कमलपंखुडीनी

 दिवस तुझा देखील येईल


भरकटलेल्या मनस्थितीचा

नको आता उगी गलगला

फेकून दे कात काळोखी

धैर्याने पुढे जायचंय तुला


Rate this content
Log in