आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात


आयुष्याच्या सहवासात
मन मोहरून जातं
कितीही त्याचा सहवास
असा हा हवा हवासा प्रवास
आयुष्याच्या सहवासात
क्षण सोनेरी क्षण चंदेरी
वेचले असे पुन्हा पुन्हा
नव्याने जीवन जगले
आयुष्याच्या सहवासात
मनाचे फूल हे नेहमीच
सुगंधी उमलते ठेवले
काटयांचा स्पर्श कितीही झाला
तरीही जीवन फूल फुलवत ठेवले
आयुष्याच्या सहवासात
हिरव्या हिरव्या पानात
पाहिले मी जग आता
सावलीच्या उन्हात
आयुष्याच्या सहवासात
वाट ही अशी जीवनाची
चालत राहिलो चालत राहिलो
कधी न थांबण्यासाठी
आयुष्याच्या सहवासात
मी पक्षी होऊन उडतो
सुखाच्या धारा झेलून
आनंदाच्या झाडावर बसतो
आयुष्याच्या सहवासात
रंगीत इंद्रधनुष्य होऊन
सप्तरंग भरतो जीवनात
आयुष्याच्या सहवासात
आंधर्या रात्रीत मी
उद्याची सुखं सोनेरी
पहाट पहातो भविष्यात
आयुष्याच्या सहवासात
मी नेहमीच खुश आसतो
आयुष्याच्या सहवासात
असे कितीक क्षण पहातो
तेच आयुष्य तोच सहवास
पुन्हा नव्याने मी अनुभवतो