॥आयुष्याचं गणित॥
॥आयुष्याचं गणित॥
आयुष्याच्या सहवासात फुलला पारीजातक
बालपणी चाफा डवरला तारुण्यात मोगरा बहरला,
सुटला सुंगध क्षितीजाच्या वाटेवर दरवळला गंध
ओंजळीत जपून ठेवली फुलं दडवुन ठेवली श्वासात लहर
सहवासात खूप काही शिकायला मिळाले
केवड्याच्या वासाबरोबर टोचले काटे
जीवन संपवुन टाकावसं क्षणभर वाटे
आधार कणखर, समजुत काढली नको नको अशी पळवाट
सुखाच्या क्षणांचा लागेल निश्चित घाट
नव्याने आला बहर जीवनरथ हाकण्यासाठी मिळाला जीवनसाथी
सुख-दुःखाच्या भोवर्यात विणली गेली नाती
घट्ट धाग्याची ही वीण सदा घट्ट हातात हात धरून दुरवर चालावंसं वाटतं
नाटकाचा तिसरा अंक झाला सुरू
सुन, मुलं, नातवंडांनी घर गेले भरून
तारूण्याच्या उंबरठ्यावर रेंगाळता रेंगाळता
वृद्धत्वाच्या दारावर नकळत राहीलो उभा
आधार नाही लागला काठीचा, ना मुखात कवळी
नित्याने रामनाम जपतो, घे हसत हसत बोलावून देवा तुझ्याजवळी॥