आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याची संध्याकाळ
निळ्याशार किनारी सागराच्या त्या
व्हावी सुरेल ती आयुष्याची संध्याकाळ
असावा सोबतीला तो चंद्र पौर्णिमेचा
चमचमणार्या काजव्यांची सुंदर ती दीपमाळ...
थंड वार्यावर उडणारे कण रेतीचे
स्पर्शताच देहास रोम रोम अंगी शहारावे
वार्यातून दरवळणारा गंध तो मोगऱ्याचा
पाहून तिथला तो नजारा मनाने या बहरावे...
अविस्मरणीय व्हावी ती संध्याकाळ
सापडावा जसा मोती अवचित शिंपल्यात
ठेवण्या आठवणीत तो गहिरा क्षण
घ्यावी लेखणी हाती नि मांडावे त्यास चारोळ्यात...
आयुष्याची संध्याकाळ नेहमीच अशी
राहील ती आपल्या मनाच्या कोपऱ्यात
कोपर्यासवे मनाच्या ती घेईल हिंदोळा
कधी बसता एकांतात आपल्या ओल्या नयनात...
