आयुष्याची काही पाने...
आयुष्याची काही पाने...
1 min
132
पाने काही आयुष्याची
हलकेच मी चाळली
रडणारी हसणारी
चाळतांना ती कळली
काही होती अल्लडशी
वाहणाऱ्या नदीपरि
अशी निर्मळ स्वच्छंदी
खुदूखुदू हसणारी
गात होते कुणीतरी
उलटता काही पाने
होते ते ओळखीचेच
दर्दभरी असे गाणे
होते आघात झालेले
काही त्या पानांवरती
ओरखडे जखमांचे
मज धुसर स्मरती
आयुष्याची काही पाने
आहे तशीच ती कोरी
आहे हे विधिलिखित
नशिबाची खेळी सारी
