STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
277

आयुष्याच्या या वळणावर जुळून

आली नाती माया अन् ममतेची

सोबत एकमेकांची अशी लाभली

ओळख निर्माण झाली समतेची//१//


आयुष्याची वाटचाल करत असताना

अनंत येतात अडचणी माणसाला

योग्य दिशेनं मार्गक्रमन करून

चालावे न कंटाळता जीवनाला//२//


आयुष्यात असतात वेदना,विवंचना

न डगमगता खंबीर ठेवावे मना

आयुष्य म्हणजे एक प्रवास

जगावे निवांत एक,एक क्षणा//३//


आयुष्य सुंदर बनवावे लागते

नित्य हसतमुख राहून सदा

योग, ध्यानाने, नित्य आपली

ठेवावी निरोगी, शरीर संपदा//४//


Rate this content
Log in