STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
12K

होती ती एक काळोखाची रात 

नियतीने काय लिहिले होते नाही माहित त्यात 

का बरे केला तिथेच दैवाने माझा घात 

क्षणात एका विझली पंचप्राणाची वात


क्षणभंगुर जीवन हे नाही

कोणताच भरोसा 

मृत्युवरी पण मृत्यु म्हणून मी

भरोसा ठेवू तरी कसा 

धावला कितीही दूर तरी 

सिंहाचे भक्ष्य बनतोच जसा 

कुणी खेळणारा, बागडणारा

लहानगा कुणी ससा


नाकारल तरी ते आहे तितकेच खरे

कधी तरी तो यमराज ठोठावील माझं दार 

राहिल मागं नातेवाईक,

पैसा, मोठाली घर 

तिरडीला हात देतील 

फक्त माणसं चार


हा खोटा अहंकार इथे

नाही कुणाचा टिकला 

कवडीमोलाने हा जीव 

मृत्युला विकला

गळतोच आंबा जेव्हा

तो असतो पिकला 

पण माणूस जगणे 

आजवरी नाही शिकला


हे स्वप्न होते, कळले 

आली जेव्हा जाग 

जीवनासोबत तर 

ईमानाने वाग

नाही पुसू शकत कुणी शहाणा चंद्रावरील डाग

मरणातून जीवन शिकले 

जेव्हा आली मला जाग


Rate this content
Log in