आयुष्य !
आयुष्य !
1 min
262
आयुष्य म्हणजे ,
चढ उतरांचा घाट !
नागमोडी वळणाऱ्या ,
वळणांची वाट !!
वळणावरून कधीतरी ,
मागे वळून पहावं !
अडकलंय का मन ?
थांबलंय कुठे बघावं !!
वाटेवरच्या अनोळखी ,
पायवाटेने ही जावं !
चुकली जरी वाट .
रान फुलांना विचारावं !!
वळणावर लाभावी ,
सहप्रवाश्याची साथ !
सोबतीने व्हावा ,
सुखाचा हा प्रवास !!
