आयुष्य
आयुष्य
1 min
373
आयुष्य म्हणजे धडपड
जगण्यासाठी श्वासांची
पोटासाठी कामाची
यशासाठी प्रयत्नांची
धडपड आयुष्याची
आयुष्य म्हणजे गुंतागुंत
घरातल्या नात्यांची
ह्रदयातल्या भावनांची
मनातल्या ध्येयाची
गुंतागुंत आयुष्याची
आयुष्य म्हणजे स्विकार
जिवनातल्या अडथळयांचा
येणारया दुःखाचा
मिळणारया सुखाचा
स्विकार आयुष्याचा
आयुष्य म्हणजे कळवळ
इतरांच्या दुःखाची
इतरांच्या सुखाची
त्यांच्या सुखासाठी प्रयत्नांची
कळवळ आयुष्याची
आयुष्य म्हणजे ओंकार
निरविकार जिवनाचा
अनंतात विलिनीकरणाचा
शुन्य अर्थाचा आ ओंकार आयुष्याचा
