आयुष्य
आयुष्य
1 min
339
आयुष्य खुप सुंदर आहे
हसत खेळत जगायला शिका
आयुष्याची ध्येये ठरवुन
त्या दिशेने पाऊले टाकायला शिका
वाटेत चालताना अडथळे आले तर
त्यावर मात करुन पुढे जायला शिका
आयुष्य किती राहिले त्यापेक्षा कसे
घालविले याचा विचार करायला शिका
सुंदर आयुष्य पुन्हा नाही
हे जाणून घ्यायला शिका
आयुष्य जगत असताना चांगली
माणसे जोडायला शिका
गरजूंना मदत करायला शिका
सुख दुःखाच्या जाळ्यात अडकू नका
सुखाचा आनंद घ्यायला शिका
दुःखाला दूर लोटा
कारण आयुष्य खुप सुंदर आहे
हसत खेळत जगायला शिका
