आयुष्य तू ही थोडं जगून घे
आयुष्य तू ही थोडं जगून घे

1 min

171
काळानुसार बदलत जाण ही वृत्ती तुझी
प्रत्येक परिस्थितीला तोंड देणं हि प्रवृत्ती तुझी
धाव तुझी घड्याळाच्या काट्यासारखी,
थांबत नाहीस तू कधीच
यशासाठी जगत राहिलास,
स्वतःसाठी तू जगला नाहीस कधीच
विश्वास ठेव स्वतःवर, तुझ्या मनगटाच्या बळावर
जग तुला ओळखूदे तुझ्या कर्तृत्वावर
काय हवं ते समजून घे, आयुष्य तूही थोडं जगून घे