आयुष्य सुंदर आहेच
आयुष्य सुंदर आहेच
1 min
57
आयुष्य सुंदर आहेच
फक्त कुठे बोलायचं
आणि कुठे थांबायचं हे समजले पाहिजे
आयुष्य सुंदर आहेच
फक्त किती सांगायचं
आणि किती ऐकायचं हे समजले पाहिजे
आयुष्य सुंदर आहेच
फक्त किती ताणाचे
आणि किती सोडायचं हे समजले पाहिजे
आयुष्य सुंदर आहेच
फक्त किती करायचं
आणि कुणासाठी करायचं हे समजले पाहिजे
