STORYMIRROR

Manda Khandare

Others

2  

Manda Khandare

Others

आयुष्य म्हणती याला

आयुष्य म्हणती याला

1 min
2.6K

दुःखाच्या क्षणांना आठवतेस का तु।

सुखाच्या गोळा-बेरजा करत जा तु।।


मृगजळाच्या मागे अशी धावतो का आहेस

जरा आळोशाला निवांत, बसत जा तु।।


पिवळे पान जरी गळून पडले असले।

तरी आठवणींच्या वहीत त्याला जपत जा तु।।


झाले गेले विघटित,विसरत जा तु

येणाऱ्या क्षणांचा उत्साह करत जा तु।।


आरश्यात प्रतिबिंब शोधते का असे।

मनात आठवणींची, कास धरत जा तु।।


हे शल्य जगण्याचे बोचरे जरी असले।

कट्यांना फुला परी,उरी जपत जा तु।।


हिरावुन घेतले जरी सर्व काही तुझे।

पुंण्याचे घडे तरी डोळे झाक भरत जा तु।।



Rate this content
Log in