STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

आयुष्य म्हणजे जणू स्वयंपाकच

आयुष्य म्हणजे जणू स्वयंपाकच

1 min
23.4K

आयुष्य म्हणजे जणू स्वयंपाकच

सगळी जिनसं नेटकी हवी

तरच जेवणात चव येते जशी

आयुष्यातही रंगत येते तशी


कष्ट, प्रयत्न, परिश्रमाची

द्यावी लागते फोडणी खमंग

जीवनात आपल्या तेव्हाच येते

यशाचा सुंदर रंगतदार तवंग


कौशल्याचे मिळतात गुलाबजाम

सरावाच्या पाकात मुरून

योग्य अयोग्य शिक्षण मिळते

गोड, तिखट अनुभव चाखून


तिखट, मीठ मसाल्याने

जसा स्वयंपाक होतो चवदार

सुख, दुःखाच्या मिसळीने

आयुष्यही होते चटकदार


Rate this content
Log in