आयुष्य हे आपलं आहे
आयुष्य हे आपलं आहे
का कुणासाठी उगीच झुरायचं
अन् का कुणासाठी मरायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं.....
नसेल विश्वास आपल्यावर
तर कशाला पुरावे देत बसायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं......
ज्यांना आवडतो त्यांना जपायचं
ज्यांना खूपतो त्यांना सोडायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं......
लाखो तोंडे लाखो बांते
कशाला विचार करतं बसायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं......
आपण आहोत तसेच वागायचं
कशाला कुणासाठी बदलायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं.......
स्वतःची किंमत स्वतःच करायचं
इतरांकडून प्रशंसेची वाट का बघायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं......
स्वतःच स्वत:वर प्रेम करायचं
आपलं हात आपणच घट्ट धरायचं
आयुष्य हे आपलं आहे
आपण आपल्या परीने जगायचं...
