आयुष्य असं असायला पाहिजे
आयुष्य असं असायला पाहिजे
1 min
170
प्रत्येकाला वाटत असते की
आयुष्य असं असायला पाहिजे
आयुष्य तसं असायला पाहिजे
आपल्या मनातील इच्छा आकांक्षा
कधीही पूर्ण होत नाहीत काही केल्या
कितीही सुख मिळाले तरी पण
अजून सुखच मिळत राहावे वाटते
आयुष्यात दुःख नकोच असते कोणालाही
पण सुखाचे महत्व कळेना दुःखाशिवाय
सुख नी दुःख म्हणजे आहे लपंडाव
दिवस नि रात्र कधी भेटत नाहीत
तसेच आयुष्यात सुख नि दुःख
एकमेकांना कधीच भेटत नाहीत
जसे आयुष्य आहे तसे जगून घ्यावे
दुःखानंतर येणाऱ्या सुखाचे स्वागत करावे
