आवडतं मला
आवडतं मला
1 min
324
आवडतं मला
तुझं माझ्यावर, माझ्यासाठी
प्रेमाने झुरणं..
मंद वाऱ्यासह हलकेच
मला मिठीत घेणं...
आवडतं मला
तुझं माझ्यावर पूर्णतः
विश्वास दाखवणं
मी तुझ्या बरोबर आहे..म्हणत
मला पाठिंबा देणं...
आवडतं मला
तुझं मला समजून
मला कुरवाळणं...
भांडण झालं तरी
हसतच वेळ साधणं...
आवडतं मला
तू आहे तशीच रहा
असं म्हणणं...
तू माझी राणी म्हणत
प्रेमगीत गुणगुणणं...!
