आवडती मालिका
आवडती मालिका
1 min
109
तारक मेहता का उल्टा चष्मा
हलका फुलका छान कार्यक्रम
सर्वांनाच फार हसवणारा
सर्वांच्याच भावनांची अतंरातून
उत्तम जपणूक करणारा...
पात्र यातील वाटतात खरी
वाद घालतात, मजा घेतात
सदैव इथे सणवार, उत्सव
अती उत्सहात साजरे होतात...
या मालिकेत दाखवला आहे
सर्वधमसमभाव, समानता
सारेजण मिळूनमिसळून राहतात
जपतात सामाजिक एकात्मता...
गणपती उत्सवात धमाल करतात
वेगवेगळे उपक्रम छान राबवतात
पारंपारीक पोशाखात वावरतात
दहा दिवस आनंदात घालवतात...
संकट कोणावरही कितीमोठे येवू दे
सावरून घेतात सर्व मिळूनी
एकत्र होवूनी संकटांना सामोरे जातात
संकटे सरताच सर्व जातात आनंदूनी...
