आवडता बाप्पा
आवडता बाप्पा
1 min
535
खर सांगू काल मला
आनंद खूपच झाला
आमच्या घरी सुंदर
गणपती बाप्पा आला
आईने केले तयार छान
बसायला सुंदर मखर
लाईट एवढे नको लावू
बाप्पा सांगत होता प्रखर
मग लावली छान समई
बाप्पा झाला खूश खूप
गोड गोड मोदक केले
पूजा,आरती लावला धूप
खूप खूप मजा करू बाप्पा
दहा दिवस राहणार आता
खेळायला ये ना माझ्यासंगे
तूच सर्वांचा बाप्पा आवडता
हात जोडून करतो प्रार्थना
सर्वांना सुखी ठेव ना बाप्पा
आई बाबांची काळजी कमी
मारू आनंदाने छान गप्पा
