आवड तुला
आवड तुला
1 min
12.6K
हे गजानना
हे गौरीनंदना
आवड तुला दुर्वांची
आवड तुला मोदकांची
जास्वंदीच्या लाल फुलांची
हे गजानना
हे गौरीनंदना
देवांचा तू सेनापती
परशू घेऊनिया हाती
रक्षा करसी सर्वांची
रक्षा करसु सर्वांची
हे विघ्नेश्वरा, हे मोरेश्वरा
गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा माळा
पायात चांदीचा वाळा वाळा
बघा नाचतो नाचतो कसा हा
भक्तगणांचा मेळा मेळा
आवड तुला भक्तांची
आवड भक्ती भावाची
भक्तांच्या हाकेची
हे गजानना
हे गौरीच्या बाळा
आवड तुला दुर्वांची
आवड तुला मोदकांची
जास्वंदीच्या लाल फुलांची
