आतुरता .....
आतुरता .....
असच एकदा मनात इच्छा आली तुला भेटण्याची .....
धावपळ न करता तुज्या बरोबर सावकाश चालण्याची ....
आले मनी सांगाव्यात तुला मनातल्या खूप साऱ्या गोष्टी ..
जपून ठेवावे ते क्षण मनातल्या कोपऱ्याशी ...
हुरहूर लागलेली तुला भेटण्याची ...
आतुर झालेले मन तुला बघण्यासाठी ...
मनाची गाडी तुला भेटण्यासाठी कधीच सुरु झाली ...
तीही जलद वेगाने तुज्या कडे पोहोचण्यासाठी धावू लागली ...
एवढयात मोबाईलवर तुला मेसेज आला ...
माझ्या डोळ्यानी तो लवकर टिपला ...
"i am sorry i cant meet you today "
माझ्या मनातल्या जलद गाडीने एकदम ब्रेक मारला ...
आणि माझ्या हुरहूर मनाच्या त्या गाडीचा तिथेच प्रवास संपला .....
