STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

आतुरता

आतुरता

1 min
161

माझा रंगीतसंगीत खडू

आतुरतेने माझी वाट पाहतोय

माझा काळा काळा फळा

मला ये म्हणून खुणावतोय...


पण हाय! काय करावे दैवा?

मला बाहेरच पडता येईना

कोरोनाने हाहाकार माजवलाय

काही केल्या काही सध्या उमजेना....


माझी मुलं नाचताना आठवतात

निरागस चेहरे डोळ्या समोर येतात

बाई,बाई ,बाई हाक कानी येते

सतत हेच भास होत होतात....


अभ्यास देतेय व्हाॅटसॅपवर

पण तन,मन शाळेत असे झालेय

कधी माझ्या पाखरांना भेटतेय

असे मला सदोदितच वाटतेय.....


तो परिपाठ,ती चिमणीपाखरं

सारे सारे मी खूप मिस करतेय

त्यांचे माझ्यावरील अतोनात प्रेम

खरचच सतत मला आठवतेय,......


Rate this content
Log in