आतुरता लालपरीची
आतुरता लालपरीची
लालपरी म्हणजे जणू
राणीचं ते सुंदर रूप ,
गावोगावीचा प्रवास
आज केलाय तिनं खूप !!
लालपरीच्या प्रवासात
लहान थोर सगळेच रमतात ,
पळती झाडे पाहण्याचा
आनंद मनसोक्तपणे घेतात !!
नकळत असा लालपरीला
जडला कोणता आजार ,
लालपरी च्या संपामुळे
बंद पडलाय शहरी बाजार !!
हातावरच्या पोटासाठी
कर्मचारी आले रस्त्यावरी ,
मागण्या अन् हक्कांसाठी
धाव घेतली शासन दरबारी !!
न्याय निवाड्याच्या कचाट्यात
भरडुन गेले वाहक, चालक ,
सरकारी नोकरी गमावून बसला
कर्ता करविता घराचा मालक !!
लालपरीच्या बेमुदत संपात
चला आपण सामील होऊ या ,
विजयी होऊन येत्या वर्षात
अमृत महोत्सव साजरा करु या !!