आठवतात ते दिवस
आठवतात ते दिवस
1 min
229
आठवतात ते दिवस
आईचे काबाडकष्ट
बापाची हमाली
पोटासाठी खाल्लेल उष्ट
आठवतात ते दिवस
गावातील जेवणावळी
न बोलवता घातलेली मांडी
जेवणानंतर उचलेल्या पत्रावळी
आठवतात ते दिवस
गांडीवर ठिगाळलेली इजार
अंगात मळकी कपडे
त्वचेवर जडलेले विकार
आठवतात ते दिवस
घराकडील सावकाराचा फेरा
खाली मान घातलेला बाप
खिन्न मनाने बघितलेला गोंधळ सारा
आठवले जरी ते दिवस
गरिबीत जीवन जगताना
नाही पत्करली लाचारी
समाजात वावरताना...
