आठवणीतलं गुलाब...!
आठवणीतलं गुलाब...!
1 min
360
आठवणीच्या गावा जातांना
तो सारखा पाठलाग करतो
एक गुलाब दिलेला मला
सारखं आठवणीत साठवत असतो...
सुकलेली जरी असले पाने
आठवणींनी तुझ्या डचडच भारलेलं
तुझ्या ओलाव्याच जाणवणं मला
हृदयाच्या खोलवर खूप रुतलेलं...
पाकळी पाकळी वेगळी तरी
रोज नव्यानं तुझं उमलणं
तुझं आमच्या आयुष्यात स्थान
जपून ठेवलेली पाकळी सांगणं...
किती काळ सरला तरी
गुलाब अजून त्यातच दडलेलं
स्वप्नात घट्ट मिठी मारत
पापण्यांचे थेंब त्यावर पडलेलं...
