STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

आठवणीतले गांव

आठवणीतले गांव

1 min
288

संपली परीक्षा, लागली सुट्टी

मस्त मजा, मस्ती

चला मामाच्या गावाला करु वस्ती


सवंगड्यांबरोबर खेळू लगोरी, विटीदांडू, आट्यापाट्या

संपवायच्या चला आमरसाच्या वाट्या


दगड मारुन पाडू कैर्‍या, चिंच, बोरं

पिंकीच्या खिशात लपवुन ठेवायची पोरं


घराच्या कोनाड्यात बसायचे चिडीचुप

आजोबांच्या काठीचा दरारा घरात खुप  


न सांगता शेतात जायचे उंडारायला

विहीरीत उड्या मारायच्या पोहायला 


चोरुन आंबे यायचे घेऊन 

मालक यायचा पाठीमागे धाउन 


उडवुन लावायची त्याची टोपी  

गौष्ट ऐकत आजीच्या कुशीत जायचे झोपी 


मावशीच्या काढायच्या छप्पन्न खोड्या 

डोळे वटारत आई ठोकायची दोरीच्या बेड्या 


असायची मामाच्या गावाला मजा रोज

नव्या युगात मोबाईलचं झालं ओझं


झटकुन टाका, नका करू जवळ

मामाच्या गावाचं उन घ्या अंगावर कोवळ


कोवळ्या उन्हात करा मस्त न्याहारी

झुंजूमुंजू पहाटे गाणी गाते वासुदेवाची स्वारी ||



Rate this content
Log in