आठवणीतील एक दिवस
आठवणीतील एक दिवस
1 min
611
आठवते आजही मला
त्र्यंबकेश्वरचे दर्शन
तु नि मी आपण दोघी
ठरले आपले मिशन
सकाळची वेळ होती
पहिलीच बस होती
गार गार वारा नि
डोळयावर झोप होती
पाऊल ठेवलं त्र्यंबकमध्ये
पोटात कावळे करी कावकाव
गेलो मग हॉटेल मध्ये
हाणले दोन वडापाव
मग गाठले मंदिर सत्वर
स्वामींची मुर्ती दिसे मनोहर
हटता हटेना आपली नजर
दिवस सार्थकी लागला खरोखर
विसरणार नाही कधी मी
तुझ्या बरोबरचा हा प्रवास
तुझ्याबरोबरच्या आठवणी
साठवून ठेवल्यात खास
