आठवणींच्या किनाऱ्यावर
आठवणींच्या किनाऱ्यावर
1 min
353
हवं तेव्हा टेकता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर
स्वतःलाच भेटता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर,
दूर दूर पाहता येतं,
शुभ्र धुक्यात हरवता येतं
भविष्यालाही गाठता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर,
मनमोकळं बोलता येतं
दुःखही थोडं सोलता येतं,
स्वतःशीच भांडता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर,
अलवार लाट हळूच येते
तळपायाला स्पर्शून जाते
आतल्या लाटेत लपता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर,
शंख शिंपले जमवता येतात
वाळूत पाय रोवता येतात
वाट्टेल तेव्हा पहुडता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर,
सावल्या पायाशी रेंगाळतात
मांजरागत घुटमळतात
सुर्यास्ताला पाहता येतं
आठवणींच्या किनाऱ्यावर!!
