आठवणींचे मोती.
आठवणींचे मोती.
1 min
285
मनाच्या पोतडीतून ओघळले आठवांचे मोती,
काळाच्या पडद्यात हरवली काही जीवलग नाती!
सान पावलांच्या मला- बोट धरून,
घेऊन जायचात गोडीगुलाबीने शाळेत घरून!
रडले शाळेत जायला जर,
म्हणायचात "वर्गाबाहेर मला कोंडून धर".
नकळत शिकवायचात घड्याळ नी आकडे,
होऊ नाही दिलेत माझे शाळेशी वाकडे!
छोट्याशा बाळाला ऐकवायचात पं.भीमसेन जोशी,
कान तयार करण्याची तुमची कसोशी!
माझ्या बालपणीच्या आठवणींवर तुमचा ताबा,
असे होता माझे लाडके आबा!
