आठवणींचे डोंगर
आठवणींचे डोंगर
1 min
96
ऐका मागून ऐक डोंगर हिरव्या गच्च आठवणीं बहरलेले.
धूसर ते काहींचे दिसणे पण त्यांचे ते स्पष्ट असणे.
मी काहीच ना त्यांच्या पुढती असे भासणे.
आता आश्चर्य वाटते असे त्यांना चढून पार केले कसे?
मागे वळूनी पाहता सगळे आगळेच भासते.
"नयन रम्य हे आयुष्य माझेच का होते?" असे वाटते.
आठवतात ते फक्त छोटे छोटे किस्से,
भेटलेली काही माणसे आणि दिसलेली ती दृश्ये.
