STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

3  

Nilesh Jadhav

Others

आठवणींचा वसा...

आठवणींचा वसा...

1 min
11.7K

मी लिहिलेल्या कवितेमधून 

जर तू हरवून जात असशील तर 

मी लिहिल परत नव्याने 

मनाच्या तळघरात उतरत नाहीस तोपर्यंत...

मग तुझी नजर, तुझं रूप, किंवा तुझी भेट

कशा-कशाचीच गरज नाही. 

कारण आता सवय झाली आहे 

तुझ्या नसण्याची..

पण या शब्दांमध्ये तुझं असणं महत्वाचं आहे.

मग मी तुला हरवून देईलच कसा

खरंतर गरज नाही तरीही 

जपून ठेवलाय तुझ्या आठवणींचा वसा...


Rate this content
Log in