आठवणींचा भाग
आठवणींचा भाग
1 min
252
का मांडलास हा पसारा असा आठवणींचा.
का टाकतेस उसासा असा आठवणींचा.
ठेच लागेल पुन्हा काळजाला, सावर तू
नको करूस भरोसा त्या पोकळ आठवणींचा.
जगले ते क्षण, फुलपाखरासम उडुनी गेले.
नको करूस बोभाटा वहीत, त्या आठवणींचा.
पानाफुलात, मातीत तो गंध अजुनी आहे.
चालला सोहळा अजूनही त्या सुगंधित आठवणींचा.
मी करेल जतन त्यास, जोवर हा श्वास सुरू आहे.
डोळे मिटताच मी ही होईल, एक भाग त्या आठवणींचा.
