आठवणीच्या हिंदोळ्यावर
आठवणीच्या हिंदोळ्यावर
1 min
354
दिवस येतात अन् जातात
उरतात फक्त आठवणी,
गतकाळाला स्मरु लागता
जागतात ते हर क्षण मनी
अनुभवांचे डुलतात पक्षी
रोज आयुष्याच्या वेलीवर,
हलतो, झुलतो त्यांचा झुला
आठवणींच्या हिंदोळ्यावर
आठवणींना देत उजाळा
मनी विचार बेभान नाचतो,
कधी रडतो कधी हसतो
सुख-दु:खाचे क्षण वेचतो
काळ सरला तरी ना सरते
आठवण काळजातच उरते
खोलवर रुतून अंतरी लपते
आयुष्यभरासाठी घरच करते
आठवणींच्या हिंदोळ्यावर
देते झोका मी आठवांना
उंच उडू दे उधाण होऊन
मनी दडलेल्या साठवांना
