STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

आठवणीच्या हिंदोळ्यावर

आठवणीच्या हिंदोळ्यावर

1 min
841

आठवणीच्या हिंदोळ्यावर

आजही जीवन जगतोय,

आई तू दिला जन्म म्हणोनी

आज हे जग बघतोय !


बाप होऊनी घेतले कष्ट

आयुष्यभर न लावता डोळा,

जगताना आज जगामध्ये

येतो प्रत्येक आठवणीचां हिंदोळा!


व्हावा मी मोठा सुजाण नागरिक

म्हणोनी तुम्ही झटले रात्रंदिस,

गुरूचा शिष्य ठरवा कृतीतून

म्हणोनी जीव होतो कासावीस !


बहीण भावाचे काय सांगू

आयुष्य त्यांच्या आठवणींचा हिंदोळा,

सुखदुःखात त्यांनीच तर

लावला मला जिव्हाळा!


आठवणीच्या हिंदोळ्यानी या समाजाच्या

मिटवली माझ्या कुतुहला ची भूक,

देत राहिले प्रत्येक वेळी मला

जीवन जगण्या नवनवीन शिक!


तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावरच

मी सुखाचे आयुष्य जगतोय,

चालूनी तुमच्या शिकवणी वर

मान वर राखतोय!



Rate this content
Log in