STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

4  

Sarika Jinturkar

Others

आठवणी

आठवणी

1 min
239

आठवणीचं नातं प्रत्येकाचं वेगळं असतं 

पुस्तकातल्या मोरपिसासारखं मनाला

 ते हळुवार स्पर्श करून जातं 


कधी कोवळी सकाळ तर 

कधी हळवी व्याकूळ सायंकाळ 


आठवणींचं मनात वेगळेच एक विश्व असतं 

भर दुपारीही उन्हात कधी चांदणं दिसतं 

 आठवणीत मन फुलपाखरासारखं 

स्वच्छंदी फिरत असतं 


प्रत्येक वळणावर आठवणी आहेत 

प्रत्येक आठवणीला एक वय 

जणू हे आपणास सांगत असतं 

आठवण येताच बालपणाची 

मन अगदी निरागस होऊन जात 

 मनातल्या विचारांचा, गुंतलेल्या भावनांचा

 आभास देऊन जातं 


सौख्याचा, दुःखांचा,संगमाचा 

असलेल्या आठवलेल्या आठवणीचा 

 थोड मागून मागे वळून बघितलं 

की प्रत्येक क्षण हा सोहळा बनून जातं


 आठवणी अशाच असतात

 गडद फिकट रंगाच्या

 धाग्यात प्रसंगानुरूप आपल्याला त्यांचा रंगत ठेवणाऱ्या

 सुगंधापरी हृदयात जपण्यासाठी 

 सुखदुःखाच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी

एकांतात खूप काही बोलण्यासाठी

पाणवलेल्या पापण्यांना मायेचा स्पर्श देण्यासाठी...

 

 बेधुंद त्या क्षणांना घालूनी मग साद

 आरक्त भावनांचा लेवून साज मनही 

त्या अविस्मरणीय आठवणींत मग रमून जात..


Rate this content
Log in