आठवणी
आठवणी
1 min
245
आठवणी रडविणा-या, आठवणी हसविणा-या,
माणसं गेली सोडून पण आठवणी मन उसविणा-या!
स्वभावाला कंगोरे देऊन तासून गेल्या आठवणी,
हळवे काही क्षण देऊन रूसून गेल्या आठवणी!
काळ्याभोर निरागस डोळ्यांच्या भातुकलीच्या,
प्रेमात बुडून डोह झालेल्या मोरपीसांच्या,
धुक्याच्या पडद्यासारख्या पुसट पटलातून,
अचानक चमकणाऱ्या वीजेसारख्या आठवणी.
अडगळीच्या जागी तरी,
दडपून-जपलेल्या अनंत साठवणी!
