STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

3  

Sharad Kawathekar

Others

आठवणी

आठवणी

1 min
318

आठवणी आठवायला

काही कारण लागत नाही 

कधीही न् केव्हाही येतात

कधी एखाद्या वा-याबरोबर

येणाऱ्या सुंगधाबरोबर तर

कधी अन्य कश्यासोबतही.

कधीतरी खिडकीत उभा राहून 

बरसणारा पाऊस बघा 

आणि मग ते...

भिजलेले क्षण आठवतात 

आणि मग सुरू होतो 

आठवणींचा प्रवास 

एकांतात एक एक धागा उलगडत जातो 

धागा उलगडत जातो 

मध्येच काही ठिकाणी गाठी न् गुंताही असतो 

तोही हलक्या हाताने उलगडत जातो

धाग्याच्या शेवटी तिथं 

कदाचित कुणीतरी असते न्

जेव्हा तो दिसतो तेव्हा 

चेहऱ्यावरचे रंग बदलत जातात

आणि मग..

तिथूनच पुन्हा सुरू होतो 

आठवणीचा आणखी एक 

नवीन प्रवास जो पोहोचवतो

आपल्याला एका नवीन वेगळ्या विश्वात 


Rate this content
Log in