आठवण
आठवण
आज ही तीची आठवण येते
मोबाईलवरचा पासवर्ड पाहुन
आजही वाट बघतो मी की
पाठवेल काहीतरी लिहुन
रिंगटोन वाजली की
आज ही वाटतं
तीचाच कॉल आहे
परत मन चिडवतं
बेटा अंदाज फेल आहे
वाटतं अजुनही
ती पाठीमागून येऊन
दाबेल माझे डोळे
पण परत नापास होतात
कल्पनेचे चाळे
आजही कुशीत शिरल्याचा भास होतो
वास्तवात जीव नकळत गहीवरला जातो
ती नाही आता कुठेच
पण वाटतं आहे सगळीकडे
आठवतात ते गप्पांचे ठिकाणे दिसतात फुलांचे झाडे
मन मारुन जगण्यासाठी
रोज एक
कविता लिहीत असतो
भेटतात बऱ्याच लाईक
पण अजुनही
तीचीच वाट पाहत असतो
यायलाच नको हवी
होती जिंदगीत
पण बिच्चारी येऊन गेली
कधीच न भेटणारी
जुदाई ती मला देऊन गेली.....
