STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

आठवण सुखाची

आठवण सुखाची

1 min
351

आठवणी अनेक 

असतात मनात

काही आठवणी

राहती हृदयात 


नव्हती कसली चिंता

आठवण ती बालपणाची 

आठवण आज आठवते 

मनसोक्त बागडण्याची


पहिलेपणाच्या आठवणी

मनात घर करतात

जेव्हाही आठवतात 

मन खूश करतात 


शेवटचे प्रसंग

असतात दुःखदायी

आठवण निरोपाची 

डोळा पाणी देई 


आठवणी अपमानाच्या

आठवणी त्या सन्मानाच्या

ओशाळायला लावणाऱ्या आठवणी

आठवणी त्या प्रेमाच्या 


सगळ्यांकडे असते 

अशी एक आठवण

डोळा आणते पाणी

करते सुखाची साठवण 


Rate this content
Log in